Maitreyee Arts

  • Home (current)
  • About
  • Gallery
  • Home |
  • About Us
Goggles

About Us

प्रयत्नांती श्रीगणेश्वर 'प्रयत्नांती परमेश्वर' ही मराठी म्हण ठाऊक नाही अशी व्यक्ती दुर्मिळच! मात्र 'मैत्रेयी आर्ट्स (अहमदनगर)' या श्रीगणेशमूर्ती कारखान्याचे संचालक सौ. सोनाली जगदीश आणि श्री. जगदीश जयंत लांडगे यांच्या अथक प्रयत्नांनी 'सिद्ध' झालेल्या श्रीगणेशमूर्तींकडे पाहिल्यावर मात्र 'प्रयत्नांती श्रीगणेश्वर’' ही नवीन म्हण निर्माण करण्याचा मोह आवरता येत नाहीये. लोकमान्य टिळकांनी आरंभ केलेल्या भाद्रपदातील गणेशोत्सवात सर्वात महत्वाचा आणि अत्याधिक आनंदाचा क्षण कोणता असा जर प्रश्न विचारला तर 'सहकुटूंब जाऊन श्रीगणरायाची आनंददायी मूर्ती खरेदी करणं' हा असतो यावर कोणाचंही दुमत नसेल. या मूर्तींच्या निर्मितीत पूर्वी सर्रास वापरलं जाणारं प्लॅस्टर ऑफ पॅरीस, चकचकीत रसायनयुक्त रंग इत्यादी घटक पदार्थांमुळे पर्यावरणाचं होत असलेलं नुकसान टाळतानाच उत्सवाचं पावित्र्य टिकवून ठेवणं यावर सौ. आणि श्री. लांडगेंनी जनजागृती वाढवण्यासाठी गेले ११ वर्षं अथक प्रयत्न कसे केले याची ही साठा उत्तरी सफळ अशी त्रोटक कहाणीच आहे. उभयंतांच्या या प्रयत्नांमुळेच त्यांच्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पादनाच्या आरंभीच्या काही वर्षांमधे शाडूच्या गणेशमूर्तींबाबत एकंदरीतच वाढत असलेली सामाजिक जागृती जेंव्हा या उभयंतांनी अनुभवली तसं त्यांनी महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमधे दूरदूर प्रवास करुन, तेथील स्थानिक मूर्तीकारांचा विश्वास संपादन करुन, प्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटूंबातच एक सदस्य म्हणून राहून, अगदी जेवणाच्या ताटावर बसलेलं असतानाही त्या कलाकारांशी 'श्रीगणेशमूर्ती' या एकमेव विषयावर सखोल चर्चा करुन, निरनिराळ्या मातींवर अखंड प्रयोग करुन पर्यावरणपूरक असा शाडूमातीचाच एक विशिष्ट नमुना विकसीत केला. शासनपातळीवरील प्रयत्न (गणेशोत्सव साजरा करत असलेल्या अनेक राज्यांनी आणि महाराष्ट्रातीलही काही महानगरपालिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरीस मूर्तींना घातलेली बंदी) आणि याबाबत जी जनजागृती झालेली आहे त्यानुसारच मातीचा हा विकसित नमुना आहे हेच खरं तर लांडगे दांपत्त्याच्या झपाटलेपणाचं निर्विवाद यश आहे. सौ. लांडगे या कलाशाखेतील पदवीधर असल्यानं मूर्तीनिर्मितीमधील सौंदर्यशास्त्राची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्विकारली आणि श्री. लांडगे हे वाणिज्यशाखेचे पदवीधर असल्यानं Market Research, Marketing, Cost Cutting, Pricing या बाबी त्यांनी सहजपणे हाताळल्या. याचा इप्सित परिणाम म्हणजेच बाजारात मिळणारी कोणतीही श्रीमूर्ती आणि 'मैत्रेयी आर्ट्स ' द्वारे निर्मित श्रीमूर्ती यांच्या किंमतीत असलेली अक्षरशः ४०-४०% टक्क्यांपर्यंतची तफावत. यातील उघड गुपित असं की 'मैत्रेयी आर्ट्स ' हे स्वतःच मूर्तीउत्पादक आणि विक्रेतेही असल्यानं ग्राहकांना अत्यंत वाजवी दरात गणेशमूर्ती उपलब्ध करुन देणं त्यांना शक्य झालं आहे. (उदाहरणच सांगायचं झालं तर बाजारात जी श्रीमूर्ती रु.१००० रुपयांना मिळते तिच मूर्ती मैत्रेयीमधे साधारण ६५० रुपयांना उपलब्ध आहे.) एक ते दिड वित (६ ते १० इंच) उंचीच्या आणि त्यामुळेच घरगुती देवघरातही सहजपणे स्थापना करता येतील अश्या सुबक श्रीमूर्ती तसंच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मध्यम आकाराच्या (१० ते १५ इंच) आणि मोठ्या (२ फूट) श्रीमूर्तीही 'मैत्रेयी आर्ट्स ' मधे उपलब्ध आहेत. 'मैत्रेयी आर्ट्स ' निर्मित या श्रीमूर्तींमधील Aesthetics कडेही सुज्ञ ग्राहकांचं आपोआप लक्ष जातंच आणि थोडंसं बारकाईनं निरीक्षण केल्यावर असं आढळून येतं की साचा तयार करताना त्रासदायक ठरु नये आणि रंगकाम करण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी बाजारात मिळत असलेल्या श्रीमूर्तींवर अत्यल्प दागिने/अलंकार असतात. मात्र 'मैत्रेयी आर्ट्स ' निर्मित श्रीमूर्तींचे अलंकारही अत्यंत कोरीव आणि मनोहर नक्षीकाम केलेलेच असतात. श्रीमूर्तींमधील बारकावे, आसनावर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आवश्यक असलेला श्रीमूर्तीचा बॅलन्स, लोकांची आवड-निवड आणि बाजारातील घडामोडी यांच्या आधारानं 'मैत्रेयी' च्या कारखान्यात श्रीमूर्ती उत्पादन वर्षभर चालू असतं. मैत्रेयी आर्ट्स ' किंवा पर्यायानं सौ. आणि श्री. लांडगे या दोघांचं कौतुक करताना पुढील बाबींचा प्रकर्षानं विचार करावा लागेलः- १) श्रीमूर्तींच्या निर्मितीमागील विशिष्ट यंत्र विकसित करताना त्यांनी दोन वर्षं अक्षरशः रात्रीचा दिवस करुन आवश्यक ते Machine Design करुन घेतलं खरं पण त्यातील आवश्यक ते Tailor-Made Mechanismही त्यांनीच विकसित केलेलं आहे. २) स्वप्रयोगातून शाडूची माती विकसित करताना मातीचा पोत (Texture), तिच्यातील चिकटपणा (Adhesiveness) आणि त्या मातीचा पर्यावरणावर होणारा परिणाम अशी मातीची Pedology, तसंच वर उल्लेखलेल्या Engineeringवरही सर्वांगिण प्रभूत्व मिळवलं. ३) श्रीमूर्ती निर्मितीमधील पारंपारिक पद्धतीला (Traditional Manufacturing Process) पूर्णपणे फाटा देऊन अधिक सुलभ आणि परिणामकारक पद्धत विकसित केली. 'मैत्रेयी आर्ट्स ' निर्मित श्रीगणेशमूर्ती शब्दशः 'पार्थिव' (पृथ्वीपासून म्हणजेच केवळ मातीपासून)निर्मित असल्याने धर्मशास्त्रानुसारही शुद्ध आहेत. त्यामुळे त्यांचं जिथे विसर्जन केलं जातं त्या पाण्याच्या स्त्रोतांनाही हानी होत नाही. एवढंच नाही तर त्यांचं विसर्जन घरच्या घरी अगदी एखाद्या बादलीतही करता येणं सहज शक्य आहे. या मूर्ती एका रात्रीतच (१२ तासात) पाण्यात पूर्ण विरघळतात. त्यांना दिल्या जात असलेल्या रंगांमुळे पाणीही दूषित होत नाही कारण हे रंग पूर्णतः पाण्यात मिसळतात. भाद्रपदाआधी येत असलेल्या सणांच्या महिन्यात अर्थात् श्रावणात राखी पौर्णिमा आणि पोळा हे दोन महत्वाचे सण असतात. पर्यावरण रक्षणाची जाण मनात ठेऊनच 'मैत्रेयी आर्ट्स ' निर्मित पर्यावरणपूरक राख्या (ज्यामधे रासायनिक रंगाची चमकी, स्पंज आणि त्यावर जाड प्लॅस्टीकचे विविध आकार यांना पूर्णपणे वगळून) आणि पोळ्यासाठी बैल प्रतिमाही वर उल्लेखलेल्या श्रीगणेशमूर्तीच्याच मातीपासून निर्मित असून त्यांना Water –Based रंग दिलेले आहेत. या अभिनव संकल्पनेच्या राख्या आणि बैल प्रतिमाही यावर्षीपासून विक्रिसाठी उपलब्ध आहेत. 'मैत्रेयी आर्ट्स ' म्हणजेच सौ. आणि श्री. लांडगे यांचं स्वविकसित श्रीगणेशमूर्ती निर्मितीशास्त्र, त्यामागील प्रयत्नांची पराकाष्ठा, पर्यावरणाबाबतची प्रखर जाण हे सगळं पाहिल्यावर 'समसमा संयोग कि जाहला' असंच म्हणावंसं वाटतं. •भाद्रपदातील गणेशचतुर्थीआधी १ महिना बुकींगला आरंभ होत आहे. • किरकोळ विक्री सोबतच होलसेल विक्रीही सुरु आहे. 'मैत्रेयी आर्ट्स ' शाडूच्या गणेश मूर्तींचे कारखानदार - विक्रेते राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटी, समता हॉलसमोर, गंगा उद्यानामागे, अहमदनगर संपर्क दूरध्वनीः ८८०५९१५९५३, ९८९००२९८५०

Shop Now

More Products

Location

Get in touch

Location :

43, संवाद, राज्य सरकारी कर्मचारी हौसिंग सोसायटी, समता नगर, सावेडी, अहिल्या नगर (अहमदनगर) महाराष्ट्र, 414003.

43, Sanwad, Rajya sarkari karmchari hou.so. samtanagar, savedi, Ahilyanagar (Ahmednagar), Maharashtra 414003.

Contact :

Phone : 8805915953 | 9890029850

© 2024 Maitreyee Arts. All Rights Reserved | Design by W3layouts